कार्तिकी यात्रेसाठी पंढरी दुमदुमली!, जाणून घ्या मंदिरातील कार्यक्रमांचे नियोजन…

कार्तिकी सोहळ्यासाठी (Kartiki Ekadashi 2023) पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरी दुमदुमली!, जाणून घ्या मंदिरातील कार्यक्रमांचे नियोजन…

कार्तिकी सोहळ्यासाठी (Kartiki Ekadashi 2023) पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा होणार आहे. तर, उपमुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात पंढरपूर विकासाच्या २७०० कोटीच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार हे पाहावे लागणार आहे. मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. त्यामुळे, ७३ कोटीच्या या आराखड्याच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

असा असेल मंदिरातील कार्यक्रम…

 

पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस हे मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करणार आहे. यासोबतच, धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडून देखील फडणवीस यांची भेट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्याकडून ५ टन फुलांच्या सजावटीचे काम सुरु झाले आहे. सध्या दर्शन रांग गोपाळपूर येथील १० पत्राशेडमध्ये असून, भाविकांना दर्शनाला बारा तासांचा अवधी लागत आहे.

हे ही वाचा:

BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला

BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version