पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन यावर्षी 28 ऑगस्ट रोजी होणार

देशभरातील दिल्ली, लातूर, सोलापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, नाशिक, सांगली, विटा अशा विविध ठिकाणांहून या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यात आली आहे

पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन यावर्षी 28 ऑगस्ट रोजी होणार

पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राख असा संदेश देणारी आणि डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येणारी “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन” स्पर्धा यावर्षी रविवारी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. देशभरातील दिल्ली, लातूर, सोलापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, नाशिक, सांगली, विटा अशा विविध ठिकाणांहून या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. जवळपास 1500 स्पर्धकांनी या मॅरेथॉनसाठी नाव नोंदणीकेली आहे. डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागठिळक, जयेश कदम,उदय पाटील, आयर्नमॅन वैभव बेळगावकर, राजीव लिंग्रस, समीर चौगुले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हि माहिती दिली.

या मॅरेथॉनमध्ये 25 शासकीय अधिकारी सहभागी होणार असून. मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, डी.वाय पाटील मेडिकल कॉलेजचे संजय. डी. पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,आमदार विनय कोरे यांच्या हस्ते रविवारी सकाळी 6 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

या हाफ मॅरेथॉन मधील 5 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये 13 वर्षांपासून पुढील वय व 11 किलोमीटरची मॅरेथॉन ही 16 वर्षांपासून पुढील वय आणि 21.1 किलोमीटरची मॅरेथॉन ही 18 वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.

सकाळी उदघाटन झाल्यानंतर ठीक 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही मॅरेथॉन 21, 11 व 5 किलोमीटर अंतराची आहे. यातील 21 किलोमीटर ही स्पर्धा पन्हाळा गडापासून सुरु होऊन बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला,पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान अशा रीतीने समाप्त होणार आहे.

तर 11 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, लता मंगेशकर बंगला, पावनगड, बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज, जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान समाप्त होणार आहे. 5 किमी तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी होणार आहे.

हे ही वाचा:

जेव्हा अजितदादा आमदारांनाच झापतात…

राजकारण आणि क्राइमची सांगड घालणारा ‘महाराणी २’ सीरिजचा ट्रेलर आऊट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version