Tuesday, September 24, 2024

Latest Posts

आदित्य L १ मध्ये महिला शास्त्रद्यांचा सहभाग

भारताचे आदित्य L १ (Aditya L 1) हे २ सप्टेंबर २०२३ ला प्रक्षेपित करण्यात आले. या आधी २३ ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान ३ हे यशवीरित्या चंद्रावर पोहचेल.

भारताचे आदित्य L १ (Aditya L 1) हे २ सप्टेंबर २०२३ ला प्रक्षेपित करण्यात आले. या आधी २३ ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान ३ हे यशवीरित्या चंद्रावर पोहचेल. सूर्यवर यान पाठवणारा भारत हा २३ वा देश आहेत. या मोहिमेत अनेक महिला शास्त्रज्ञाचा सहभाग आहे. यामध्ये शास्त्रज्ञ निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम या महिलांचा सहभाग आहे. त्यामुळे या महिलांचे सगळीकडे विशेष कौतुक केले जात आहे. निगार शाजी या मोहिमेच्या संचालक असून त्याच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरुवात करण्यात आली. त्यानी या मिशनचे प्रक्षेपण केले आहे. तर अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी आदित्य L १ ची रचना करण्यासाठी विशेष योगदान दिले. ही मोहीम यशश्वी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

निगार शाजी या तामिळनाडूच्या तेनकासी येथील एका शेतकरी कुटुंबात मोठ्या झाल्या. निगार शाजी या इस्रोमध्ये रिमोट सेन्सिंग, कम्युनिकेशन्स आणि इंटरप्लॅनेटरी सॅटेलाईट प्रोग्राममध्ये अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. त्यानी तिरुनवेल्ली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी रांचीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८७ सालापासून त्यानी सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. भारताचे आदित्य-एल1 मिशन पूर्ण झाल्यानंतर स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. आदित्य L १ ही मोहीम संपूर्ण देशासाठी आनंदाची पर्वणी आहे. रिसोर्ससॅट-2ए हा राष्ट्रीय संसाधन निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे.

अन्नपूर्णा सुब्रमण्यम यांचे बालपण केरळच्या पल्लकडमध्ये गेले. त्याच्या कुटुंबाला संगीताचा वारसा होता. अन्नपूर्णी सुब्रमण्यम या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालिका आहेत.त्यानी त्याचे शिक्षण अन्नपूर्णा सुब्रमण्यम यांनी पीएचडीचे शिक्षण आईआईएमधून पूर्ण केले आहे. प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या या मोहिमेमुळे आम्हाला पहिल्यांदाचा सूर्याचा सखोल अभ्यास करणं शक्य होणार आहे. तसेच सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्येही संपूर्ण सूर्य पाहण्यास आदित्य एल-1 सक्षम असणार आहे.

Latest Posts

Don't Miss