Nagpur duronto express मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे, १५ जूनपासून ऑनलाईन रिझर्वेशन होणार बंद

रेल्वेने प्रवास करताना एसीची(ac local express ) खरी गरज उन्हाळ्यात असते. रेल्वे प्रशासनाने थर्ड एसी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणी १५ जूनपासून (June)होणार आहे. तोपर्यंत उन्हाळा जवळपास संपल्यात जमा असतो.

Nagpur duronto express मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे, १५ जूनपासून ऑनलाईन रिझर्वेशन होणार बंद

रेल्वेने प्रवास करताना एसीची(ac local express ) खरी गरज उन्हाळ्यात असते. रेल्वे प्रशासनाने थर्ड एसी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणी १५ जूनपासून (June)होणार आहे. तोपर्यंत उन्हाळा जवळपास संपल्यात जमा असतो. पावसाचे आगमन होत असल्याने उन्हाची तीव्रताही कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस एसी वाढवण्याऐवजी मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

मुंबई जाण्यासाठी नागपूरकरांसाठी सोयीची ठरत असलेल्या नागपूर-मुंबई-नागपूर (Nagpur) दुरंतो एक्स्प्रेसमध्ये प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे कारण रेल्वे प्रशासनाच्यावतीने ९असलेल्या थर्ड एसी कोचची संख्या १५ करण्यात येणार असून ८ स्लीपर कोचची संख्या दोनवर कारंब्यात येणार आहे. . या निर्णयामुळे पुढे स्लीपर तिकीट उपलब्ध नसल्यास प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत . दुरंतोमध्ये( duronto )प्रवाशांकडून थर्ड एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ती पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. १५ जूनपासून नवीन बदलाचा हा निर्णय अंमलात आणण्यात येणार आहे.या निर्णयामुळे नागपूरहून मुंबईला (mumbai )प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे तसेच मार्च महिन्यापासून याची अमलबजावणी करावी अशी अशा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

या रेल्वेगाडीत आधी एक फर्स्ट एसी, तीन सेकंड एसी होत्या. दोन जनरेटर व्हॅन होत्या. त्या तशाच राहणार आहेत. मात्र, नवीन बदल नुसार आधी थर्ड एसी ९होत्या. त्या आता १५ करण्यात येणार . आधी स्लीपर कोच आठ होते. त्याची संख्या कमी करुन २करण्यात येणार. गाडी क्रमांक १२२२९० नागपूर-सीएसएमटी मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये हा बदल १५जूनपासून लागू होणार असून, गाडी क्रमांक १२२८९सीएसएमटी मुंबई-नागपूर एक्स्प्रेसमध्ये हा बदल १६जूनपासून करण्यात येणार आहे तसेच १७फेब्रुवारीपासून सर्व बुकिंग केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग किंवा रिजर्वेशन करता करता येणार आहे.

हे ही वाचा :

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version