spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nashik येथील वैद्यकीय महाविद्यालय व खाटांचे रुग्णालय जलदगतीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा- Chhagan Bhujbal

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या दालनात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील (MUHS) वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रश्नाबाबत बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह छगन भुजबळ हे या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संस्थेचे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था इमारतीचे बांधकाम आपल्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या HSCC संस्थेकडून काढून राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी MUHS मधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६९० कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच हे काम जलदगतीने काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी नक्कीच अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे मत छगन भुजबळ यांनी मांडले.

या प्रलंबित कामाचा आतापर्यंतचा प्रवास पुढीलप्रमाणे:

  • २९ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता
  • ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर
  • इमारतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल, आराखडे व अंदाजपत्रके सामाजिक बांधकाम विभागाकडून तयार मात्र हे काम केंद्र शासनाची सार्वजनिक उपक्रम कंपनी (HSCC) कडून करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
  • दीड वर्षाहून अधिक काळ होऊनही हे काम सुरू करण्याबाबत HSCC कडून कोणतीही कार्यवाही नाही
  • सामाजिक बांधकाम विभागाकडून नाशकात बोट क्लब (मेगा पर्यटन संकुल), फनिक्युलर ट्रॉली, नाशिक विमानतळ इमारत अशा विविध प्रकल्पांची निर्मिती

  • नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे कामही सामाजिक बांधकाम विभागाकडून सुरू
  • महाराष्ट्र सदन ही दिल्लीमधील वास्तूही सामाजिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून साकार त्यामुळे MUHS वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीचे कामही सा.बां.विभागाकडून होण्याची आवश्यकता
  • मागील काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथील इमारत HSCC ऐवजी सामाजिक बांधकाम विभागाकडून बांधण्याचा शासनाचा निर्णय
  • या विभागाकडून अतिशय गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारतींचे काम त्यामुळे नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकामही HSCC ऐवजी सामाजिक बांधकाम विभागाकडून करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला नक्कीच गती मिळणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आरोग्य विद्यान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते आदींसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss