Nashik येथील वैद्यकीय महाविद्यालय व खाटांचे रुग्णालय जलदगतीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा- Chhagan Bhujbal

Nashik येथील वैद्यकीय महाविद्यालय व खाटांचे रुग्णालय जलदगतीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा- Chhagan Bhujbal

chhagan bhujbal

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या दालनात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील (MUHS) वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रश्नाबाबत बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह छगन भुजबळ हे या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संस्थेचे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था इमारतीचे बांधकाम आपल्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या HSCC संस्थेकडून काढून राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी MUHS मधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६९० कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच हे काम जलदगतीने काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी नक्कीच अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे मत छगन भुजबळ यांनी मांडले.

या प्रलंबित कामाचा आतापर्यंतचा प्रवास पुढीलप्रमाणे:

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला नक्कीच गती मिळणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आरोग्य विद्यान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते आदींसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version