spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वर्ध्यातील ओबीसी मेळाव्याकडे लोकांनी पाठ फिरवली

वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात अपेक्षित गर्दी जमली नाही. मेळाव्यातील ९० टक्के खुर्च्या या रिकाम्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. आयोजकांकडून २५ हजार ओबीसी समाजबांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्येक्ष सभेच्या ठिकाणी ३०० ते ४०० लोकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओबीसी ओबीसी मेळाव्याकडे ओबीसींनी पाठ फिरवल्याची चर्चा सभास्थळी पाह्यला मिळत आहे.

वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा होत असून या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार होते. ही सभा सकाळी अकरा वाजता सुरु होणार होती. पण ही सभा दुपारी १ वाजता सुरु झाली. विशेष बाब म्हणजे, छगन भुजबळ वर्धा शहरात दाखल झाले असून, मुख्य नेत्यांचे भाषण देखील सभास्थळी सुरू झाले आहे. मात्र, सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर, मोजक्याच लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.जालना येथे झालेल्या पहिल्या ओबीसी मेळाव्यात काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. मात्र, या सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणामुळे वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, झालेल्या एकही ओबीसी सभेत वडेट्टीवार उपस्थित राहिले नाही. तर, आज वर्ध्यात होत असलेल्या सभेत देखील वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाच्या ओबीसी नेत्यांनी लांब राहणे पसंद केले.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली शरद पवारांवर टीका

POLITICS: निवडणूक फक्त भाजपासाठी नव्हे, तर भारतासाठी, काय म्हणाले DEVENDRA FADNAVIS?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss