आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात शिवप्रीमींनी दिल्ली हायकोर्टात केली याचिका

आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात शिवप्रीमींनी  दिल्ली हायकोर्टात केली याचिका

शिवचरित्रात आग्र्याच्या लाल किल्याचे (Agra Fort) एक वेगळेच महत्व आहे. म्हणूनच यंदा शिवप्रेमींना आग्र्यामध्ये शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्याची इच्छा होती. आणि शिवप्रेमींनी आग्र्याच्या लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. पण पुरातत्व खात्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, आणि आता पुरातत्व खात्यांनी लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी नाकारली आहे. यामुळे आग्र्यातील सर्व शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.आणि आता या शिवप्रेमींनी तर्फे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी पुरातत्व खात्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आग्र्यातील शिवप्रेमी संघटना अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान (Ajinkya Devgiri Pratishthan) यांनी गेल्या तीन महिन्यांपासून या परवानगी मागण्याचा प्रयत्न केला होता. यांनी नियमित पाठपुरावा देखील केला होता. पण तरीही या संस्थेकडून मागण्यात आलेल्या शिवजयंती साजरी करण्याच्या परवानगीला नाकरण्यात आले आहे. तर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्षांचे म्हणणे आहे की “विशेष म्हणजे याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासीक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासीक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीलाच परवानगी का नाकारली” असा सवाल संतप्त झालेल्या अंजिक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला पुरातत्व खात्याला केला आहे.

शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारन्याचे कोणतेही कारण पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेले नाही आहे, तसेच आग्र्यातील लाल किल्ल्यामध्ये कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत किंवा नाकारण्याबाबत अद्याप कोणतीही नियमावली नाही आहे. असे आरोप विनोद पाटील यांच्याकडून पुरातत्व विधागावर करण्यात आले आहेत. तर या संदर्भात त्यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री किशन रेड्डी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य नेत्यांनाही शिफारस पत्र दिलं होतं. पण तरीही परवानगी नाकारण्यात आली असा आरोप अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान कडून करण्यात आला.

हे ही वाचा:

तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय?, तर बनवा साऊथ इंडियन स्टाईल रस्सम

उरलेल्या खिचडीपासून बनवा हि खास इटालियन डिश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version