सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. अशा सणासुदीच्या दिवसात नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर हे स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये २२ मेपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत.

२२ मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल ९.५० रुपये आणि डिझेल ७ रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. आज सलग १०२ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर. मुळे वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : 

लहानमुलांसाठी बनवा सकाळचा पौष्टिक नाश्ता

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर ९६.७२ रुपये लिटर आहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर ८९.६२ रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.१० तर डिझेलचा दर प्रति लिटर ९४.२८ रुपये इतका आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तर पेट्रोल, डिझेलच्या किमती देखील वाढतात. आणि कच्च्या तेलाचे दर कमी झाले तर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर जारी करण्यात येतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना

Exit mobile version