अतिवृष्टी इशारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

मुसळधार पाऊस आणि पुढील दोन दिवसात दिलेला अतिवृष्टीचा इशारा हे पाहून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आज आणि उद्या १४ जून रोजी सुट्टी जाहीर केली.

अतिवृष्टी इशारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

अतिवृष्टी इशारामुळे पिंपरी चिंचवड महा नगरपालिकेकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यात गेले पाच दिवस जोरदार पाऊस पडत आहे. कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पुढील दोन दिवसात दिलेला अतिवृष्टीचा इशारा हे पाहून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आज आणि उद्या १४ जून रोजी सुट्टी जाहीर केली. पुढील दोन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे महानगर पालिका तसेच खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे पत्रकच प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील काढले आहे.

पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर बघता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण आणि मदत कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र पावसाने चागंली हजेरी लावली आहे.

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत 

मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत कोसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोसळधारेमुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतोय. तसेच, पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे.

विदर्भात पावसाचा रुद्रावतार

नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील गोरेवाडा धरण भरले असून चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत.

हेही वाचा : 

गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना शिंदेंकडून अभिवादन

Exit mobile version