‘रयत’च्या दादा पाटील महाविद्यालयात ‘लावणी’ झालीच, अन्…

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘रयत’च्या दादा पाटील महाविद्यालयात ‘लावणी’ झालीच, अन्…

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा लावणी चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर भाजपचे सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आक्षेप घेत कार्यक्रम करू नये अशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. मात्र हा कार्यक्रम शांततेमध्ये पार पडला. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महिलांसह अनेकांनी उपस्थिती लावली होती.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आक्षेप घेत एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. त्याची एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. दादा पाटील महाविद्यालयामध्ये आठवड्याभरापूर्वी जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप सचिन पोटरे यांनी केला होता. जर महाविद्यालयात जय श्री राम घोषणा चालत नाहीत तर लावणी कार्यक्रम कसा चालतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार या सभागृहात हा लावणीचा कार्यक्रम पार पडला. यासाठी अनेकांनी उपस्थिती लावली होती. लोककला या जपल्या पाहिजेत आणि सहकुटुंब पाहण्यासारखा हा कार्यक्रम आम्ही ठेवला असल्याचं आमदार रोहित पवार मित्र मंडळाचे सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विशाल मेहेत्रे हे म्हणाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना रोप देखील चुकीचा आहे असे त्यांनी म्हंटले आहे. त्यावेळी वातावरण बिघडू नये म्हणून विध्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. महाविद्यालय परिसरात किंवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये जय श्रीराम त्या घोषणा देऊ नये, एखाद्या धार्मिक स्थळावर आपण घोषणा दिल्या तर हरकत नाही, या सूचना देताना त्यांना स्टाफ रूममध्ये बोलवण्यात आलेलं होतं, त्याला डांबून ठेवणे असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचं प्राचार्य नगरकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची लोकधारा, लोक रंग, लावणीचा प्रवास, ढोलकी व लावणीचे सादरीकरण करण्यात आले. स्सल मराठमोळ्या लोककलेचा देवघरापासून ते फडापर्यंतचा वाटचालीचा उलगडा या कार्यक्रमात करण्यात आला. महाविद्यालयात लावणी ठेवणे योग्य नसल्याचे सांगत शासनाने महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी असे सचिन पोटरे यांनी सांगितले. या लावणी कार्यक्रमावरून वातावरण चांगलेच तापले आहे.

हे ही वाचा: 

Delhi Murder Case, आधी रस्त्यात थांबले, चाकूने वार केले, अन्…

आयआयटी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, प्रवेश शुल्कातून वसूल करणार दंड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version