spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi Live in Nashik: इंडिया आघाडी विरोधी पक्षातही येऊ शकत नाही, अशाप्रकारे हरत आहे

जेव्हा या नकली सेनेचा काँग्रेसमध्ये विलीन होतील तेव्हा बाळासाहेबांची आठवण येईल. बाळासाहेबांचे वाक्य होते जेव्हा शिवसेना काँग्रेस बनेल तेव्हा शिवसेना संपेल.

नाशिकमधील पिंपळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हेमंत गोडसे आणि भरती यांच्या प्रचारार्थ नाशिक येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले. देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘गंगापुत्र’ असा केला. तसेच, गंगा पुत्र नरेंद्र मोदी यांनी फॉर्म भरल्यानंतर दक्षिण काशीला गोदावरीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. गंगापुत्र मोदीजी यांना नाशिक, नगर, मराठवाड्यात पश्चिम वाहिनीचे पाणी आणायचे आहे. मोदीजींचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ असे जनतेकडून वदवून घेतले.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील दिंडोरी येथील प्रचारसभेत बोलतांना नेहमीप्रमाणे मराठीत सुरुवात करून, नाशिकच्या सप्तशृंगी मातेला नमन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “इंडिया आघाडी या निवडणुकीत एवढ्या वाईट प्रकारे हारत आहेत की ते विपक्ष मध्येही येऊ शकत नाहीत. म्हणून येथील एका नेत्याने सांगितले आहे, निवडणुकीत सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. ही नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी यांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार हे पक्के आहे. जेव्हा या नकली सेनेचा काँग्रेसमध्ये विलीन होतील तेव्हा बाळासाहेबांची आठवण येईल. बाळासाहेबांचे वाक्य होते जेव्हा शिवसेना काँग्रेस बनेल तेव्हा शिवसेना संपेल. शिवसेनेचा हा विनाश बाळासाहेबांना दुःख देत असेल. नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या स्वप्नांचा चुराडा केला. बाळासाहेबांचे स्वप्न काश्मीरमधून आर्टीकल ३७० हटवण्याचे होते. पण नकली शिवसेनेला याचा सर्वात जास्त त्रास होतोय. राम मंदिराच्या उद्घाटनाला त्यांनी केला. आता यांचे पाप उघड पडले आहे. हे नकली शिवसेना काँग्रेसला डोक्यावर घेऊन फिरत आहे जे वीर सावरकरांना शिव्या घालतात. नकली शिवसेनेत एवढा अहंकार आहे की महाराष्ट्रातील लोकांच्या भावनांचा देखील थांगपत्ता नाही. त्यांना शिक्षा देण्याचे मत महाराष्ट्राने बनवले आहे.”

“आज मोदी गरिबांना मोफत राशन, पक्के घर, वीज कनेक्शन, गॅस, घरोघरी पाणी दिले आहेत. यात आम्ही कुठल्या धर्माबाबत भेदभाव केला नाही. पण बजेटमध्ये १५ % फक्त अल्पसंख्यांकांना देण्याचे काँग्रेसचे विचार आहेत .धर्माच्या आधारावर एवढी वाटणी. यांनी देशाची फाळणी केली. तुम्ही कल्पना करू शकता बजेटची अशी वाटणी करणे किती घातक आहे… काँग्रेससाठी अल्पसंख्यांक फक्त एकच समाज आहे. तो समाज त्यांचा आवडता व्होटबँक आहे. मी मुख्यमंत्री असताना याचा विरोध केला होता, बजेटचे १५ % फक्त त्यांच्यावर खर्च होणार होता. भाजपच्या विरोधामुळे तो निर्णय रद्द झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध होता, आता काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायला तयार आहेत. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले लक्षात ठेवा मोदी हे होऊ देणार नाही. वंचितांच्या अधिकारांचा मोदी चौकीदार आहे.”

“हि निवडणूक फक्त खासदार निवडण्याची निवडणूक नाहितर पंतप्रधान निवडण्याची आहे. कोरोनाच्या संकटात भारताने मजबूत लढा दिला. यात भारती पवार यांनी चांगले काम केले. आज कोरोनाविरोधातील विरोधातील लढ्याची पूर्ण जगात चर्चा आहे. मोदींचा पूर्ण लक्ष शेतकरी, जवान, नारीशक्ती यांच्यावर आहे.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss