PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… 

PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… 

PM Narendra Modi Live In Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे आले असून पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केला आहे.

यावेळी बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी मराठी मधून भाषणाला सुरवात केली आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की दोन दिवसांपूर्वीच आपण सर्वानी विश्वकर्म पूजेचा उत्सव हा साजरा केला आहे. महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आला आहे. तसेच देशभरातील कारागिरांना देखील प्रशिक्षण देण्यात आला आहे . आम्ही विश्वकर्मा साथीदारांना एम एस एम इ चा अर्ज दिला आहे. या विश्वकर्मा योजनेअंतर्गत १४०० कोटींचा कर्ज वाटप करण्यात आला आहे. विश्वकर्मा योजनेतून कारागिरांना कर्ज देखील देण्यात येतंय. विश्वकर्मा कारागिरांचा जीवनमान उंचावणं हेच आमचे ध्येय आहे. आमच्या सरकारकडून विश्वकर्मा कारागीरांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच साडेसहा कारागिरांना अत्याधुनिक उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या पारंपरिक कौशल्याला जगभरात ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहोत असे या वेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देखील दिले आहेत.

तसेच यावेळी बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देखील हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की की काँग्रेसने एससी एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाहीत. विश्वकर्मा जनतेच्या जीवनात समृद्धी आणणं हे आमचं लक्ष्य आहे. या योजनेसाठी वेगवेगळे विभाग एकजूट झाले आहेत. हे अभूतपूर्व आहे. देशातील ७०० हून अधिक जिल्हे, देशातील २५० लाख ग्रामपंचायती हे सर्व या मोहिमेला गती देत आहेत. या एका वर्षात १८ वेगवेगळ्या व्यवसायतील २० लाखाहून अधिक लोकांना याच्याशी जोडलं गेलं. वर्षभरात ८ लाख कारागिरांना ट्रेनिंग दिली आहे. एकट्या महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे.

महाराष्ट्रात टेक्स्टाईल उद्योगात अनेक संधी आहे. ते आम्ही ओळखले. यामुळे अमरावतीत टेक्स्टाईल पार्क सुरु करत आहोत. भारताच्या टेक्स्टाईल क्षेत्राचा गौरव पुन्हा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. अमरावतीतील पीएम मित्र पार्क हे त्याचं द्योतक आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. वर्ध्याची भूमी निवडली. केवळ ही सरकारी योजना नाही. तर भारताच्या हजारो वर्ष जुन्या कौशल्याचा विकसित भारतासाठीचा रोडमॅप आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version