राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती! डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदासाठी होणार भरती

राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती! डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदासाठी होणार भरती

राज्यातील तरुण तरुणींसाठी मोठी खुशखबर असून पोलीस होण्याचं हजारो तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती (Maharashtra Police Recruitement) केली जाणार असून पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी मुंबई पोलीस दलासाठी (Mumbai Police) तब्बल बाराशे पदे भरली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यात जवळपास ३५ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. २०२२ आणि २०२३ मध्ये राज्यात मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया (Police Bharti) पार पाडणार आहे.

कोरोनाला काळात संपूर्ण जग ठप्प झाले असताना राज्यात पोलीस भरती प्रक्रिया देखील रखडली होती. सुमारे तीन वर्षे राज्यात कोणतीही पोलीस हाराती झाली नव्हाती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात अनुक्रमे १८ हजार आणि १७ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु, आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्यात पोळी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी गृह विभागाकडून सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांमध्ये चालक, शिपाई आणि पाच जिल्ह्यांमध्ये बॅन्ड्समनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याची पोलीस भरती प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा नवी पोलीस भरती घेण्यात येणार आहे.

मुंबई पोलीस दलात तब्बल १२०० पदांसाठी होणार भरती

डिसेंबर महिन्यात राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेत मुंबई पोलीस दलात तब्बल १२०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी मुंबईत आठ हजार पदांसाठी भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलीस त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत पोलीस दलात दाखल होणार आहेत. मुंबईत सध्या ४ हजार २३० पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे ५ लाख ६९ हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी २ हजार ५७२ पोलीस हवालदार, ९१७ चालक, ७१७ तुरुंग वालदार आणि २४ बॅन्ड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

Exit mobile version