spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईला धमकीचा मॅसेज आल्याप्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे स्पष्टीकरण

काल रात्री ११.४५ मिनिटांनी ट्राफिक कंट्रोल रूमला मोबाईल मॅसेज आला आणि काही धमक्यांचे मॅसेज आले. जी कोणी मॅसेज करणारे व्यक्ती आहे त्याचा नंबर हा पाकिस्तानचा आहे असे प्रथमदर्शी दिसत आहे. याचा संपूर्ण तपास हा चालू आहेत. त्या मॅसेज मध्ये त्यांनी मुंबईला उडवण्याची धमकी दिली आहे.

काल रात्री ११.४५ मिनिटांनी ट्राफिक कंट्रोल रूमला मोबाईल मॅसेज आला आणि काही धमक्यांचे मॅसेज आले. जी कोणी मॅसेज करणारे व्यक्ती आहे त्याचा नंबर हा पाकिस्तानचा आहे असे प्रथमदर्शी दिसत आहे. याचा संपूर्ण तपास हा चालू आहेत. त्या मॅसेज मध्ये त्यांनी मुंबईला उडवण्याची धमकी दिली आहे. तसेच कसाब यासारख्या गुन्हेगारांचे नाव देखील त्या मॅसेजमध्ये आहे. अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ( Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांनी दिली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, त्या मॅसेज मध्ये अजून माहिती देखील देण्यात आली. त्यामहितीमध्ये अजून काही नंबर आहेत आणि ते नंबर हे भारताचे आहेत. या सर्व गोष्टीचा पूर्णपणे तपास हा चालू आहे. क्राइम ब्रांचच्या तीन टीम या गोष्टीची पूर्णपणे तपासणी करत आहेत. ज्यांनी हे मॅसेज केले आहेत ते सर्व तपासणी सुरु आहेत. तसेच जे मॅसेज चे नंबर आहेत ते नक्की कुठले आहेत या सर्वांचा तपास हा सुरु आहे असे मुंबई आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. तसेच मुंबई पोलीस कोणतीही गोष्ट हल्ल्यात घेत नाही. अत्यंत गंभीरपणे यासर्वकडे पाहत आहोत, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण जनतेला आम्ही सांगू शकतो कि, मुंबई आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे काम चालू ठेवण्याचे काम आमचे चालू आहे आणि पूर्णपणे यशस्वी देखील होऊ.

आम्ही सर्व केंद्रीय संस्थांशी समन्वय साधत आहोत आणि कॉलरचा शोध घेण्यासाठी एकत्र काम करत आहोत. आम्ही काही होणार नाही हे पाहू आणि आम्ही मुंबईकरांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सतर्क आहोत आणि आम्ही मुंबई सुरक्षित ठेवू अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली आहे.

 

हे ही वाचा :-

आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, दीपक केसरकारांचे वक्तव्य

जळगाव जिल्ह्यात शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर फाडले

Latest Posts

Don't Miss