वादग्रस्त विधान करणारे पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

वादग्रस्त विधान करणारे पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

जळगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर काल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जळगावमधील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मराठा समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत किरणकुमार बकाले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पोलीस उपधीक्षकांना चौकशी करून लवकरात लवकर अहवाल पाठवण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिले आहेत.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे १ नोव्हेंबर २०२० पासून जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यकरत आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणुकीत असलेल्या एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदनीय आणि विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यावरून मराठा समाजासह विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत बकाले यांची बुधवारी तत्काळ बदली करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या दिवशी बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना, उच्च नैतिक मुल्यं बाळगून, लोकांप्रती सौजन्य आणि सद्वर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असं असतानाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर केला आहे. व्हायरल ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जाऊन पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. बकाले यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था अडथळा निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नये, तसेच पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

हे ही वाचा:

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

सुकेश खंडणी प्रकरणी जॅक्लीन फर्नांडीसनंतर दिल्ली पोलिस करणार ‘या’ अभिनेत्रीची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version