पोलीस भरती झालीच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

पोलीस भरती झालीच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नांदेडमधील (Nanded) कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचे दिसून आलेआहे. यावेळी रखडलेली पोलीस भरती (Police Recruitment) झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या (Hyderabad Liberation Day) निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामुळे कार्यक्रमात गोंधळ पहिला मिळाला. पोलिसांनकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

नांदेड येथे मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यांची मागणी लवकरात लवकर पोलीस आणि शिक्षक भरती व्हावी अशी होती. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती कधी होणार असा प्रश्न तरुणांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. फडणवीड बाहेर येताच विद्यार्थ्यांकडून घोषणा बाजी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांकडे आले पण काही न बोलताच निघून गेले. पोलिसांन गर्दीवर नियंत्रणात करण्याकरिता सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

मुलीवर प्रेमाचा वर्षाव करतानाचा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा फोटो होतोय व्हायरल

या प्रकणावर राष्ट्रवादीचे विरोधी नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तरुण बेरोजगार आहेत, नोकरी तर मागायला जाणारच ना असा खोचक टोला अजित यावर यांनी देवेंद्र फडणवीसांना लागावला. आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी मला पण सकाळपासून मुलं भेटली आणि म्हणाली की आमच्या नोकरीचं काय. आम्ही पोलीस भरती, शिक्षक भरती काढल्या होत्या. दुर्दैवाने शिक्षक भरतीत भ्रष्टाचार झाल्याने ती थांबवावी लागली. परत करण्याचा विचार केला तोवर आमचं सरकार गेला. महिनाभरापूर्वी नवीन आलेल्या सरकारने पोलिस भरतीची घोषणा केली होती पण अद्याप भरती सुरु न झाल्याने विध्यार्थी संतप्त झाले.

हे ही वाचा:

आशिष शेलारांनी केला शिवसेनेवर गंभीर आरोप

अखेर भारतात ‘चित्ता’ परतला, नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्ते अभयारण्यात सोडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version