Friday, September 27, 2024

Latest Posts

उजनी धरण १०० टक्के भरण्याची शक्यता

राज्यभरात मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात चांगल्या प्रमाणत पावसाची नोंद झाली आहे.

राज्यभरात मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात चांगल्या प्रमाणत पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण हंगामात सोलापूर आणि काही भागात पावसाने पाठ फिरवली होती. पण आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार बरसात आलेल्या पावसामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ऊस पिकाच्या लागवडीला सुरुवात होणार आहे. तसेच शेतात उभा असलेल्या पिकाला पाणी मिळणार आहे.उजनी धरणात पाणीसाठा ४२ टक्के असून आता पाण्याची पातळी ५० टक्के एवढी झाली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे.

आज सकाळपासून ४० हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. त्यामुळे धरण ५० टक्के पाणी पातळी ओलंडल्याची शक्यता आहे. उजनीतील पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेतातील रब्बी पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ४४ साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. तर अजून काही दिवस परतीच्या पावसाने साथ दिल्यास धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा , अशी मागणी विविध पक्ष आणि संघटना यांनी केली होती. जनावरांचा चारा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवण्याची गरज होती. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा अशाउजनी धरणातून ५ टीएमसी पाणी सोडण्याची वेळ आली होती. पाण्याअभावी ऊस शेती जळू लागली होती. पण मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

उजनीत येणाऱ्या कुकडी कॉम्प्लेक्समधील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव वडज डिंभे या धरणातील पाणी कुकडी धरणातून घोड नदीत सोडलं जात आहे. हे पाणी दौंडजवळ भीमेला मिळून थेट उजनी धरणाकडे जात. पुण्याजवळील खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेतमधील पाणीही उजनीकडे जाऊन लागल्यामुळे धरण ५० टक्के पाणी पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तसेच पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

 

Latest Posts

Don't Miss