17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतच्या निवडणुकांना स्थगिती

राज्यात 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

मुंबई : राज्यात 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदा आणि नगरपंचायत च्या निवडणुका 8 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार. निवडणूक कार्यक्रमांना स्थगिती दिल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेल्या आचार संहिताही लागू करता येणार नाही.

काल सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून 19 तारखेवर यावर भाष्य केले जाईल असे सांगण्यात आले. त्याचबरोबर इम्पेरिकल डाटाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागून घेतलेला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी ही 19 जुलै रोजी करण्यात येईल असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

अमीर खान डान्स दिवाने जुनिअरच्या शूटिंगदरम्यान दिसला

सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम येत्या काळात देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर केलेल्या आचारसंहिता देखील लागू करण्यात येणार नाही.

दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, अमरावती, लातूर आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायत यांचा समावेश आहे.

सावंतवाडी ते दिल्ली केसरकर एक्सप्रेस सुस्साट !

Exit mobile version