Thursday, July 4, 2024

Latest Posts

OBC आणि Maratha Reservation यांचं ताट वेगळं असावं, Prakash Ambedkar यांनी घेतली Lakshman Hake यांची भेट

प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी पिले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना, "आमची आधीपासूनच भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये," असे म्हंटले.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (गुरुवार, २० जून) गेल्या आठ दिवसांपासून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचावच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेल्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची भेट घेतली. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री (Vadigodri) या गावी उपोषणस्थाला भेट देऊन ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी, प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी पिले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना, “आमची आधीपासूनच भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये,” असे म्हंटले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अश्या शाश्वत झालेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिकदृष्ट्या सलोखा बिघडला जातो. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे ताट वेगळे असले पाहिजे.”

ते पुढे म्हणाले,” मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे ताट वेगळे हवे. दोघांना एकमेकांसमोर विधानसभेपर्यंत भिडवत राहतील, अशी माझी धारणा आहे. भाजप संविधान बदलेल या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. ओबीसींनी संविधानावरती विश्वास ठेवला. हा आरक्षण वाचवण्याचा सर्वात मोठा भाग असू शकतो,” असे ते म्हणाले.

उपचार घेण्यास हाके यांचा नकार

आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी यापुढे उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच डॉक्टरांकडून तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे. यापुढे उपचार घेणार नाही पण उपोषणही सोडणार नाही अशी घोषणाही लक्ष्मण हाके यांनी केली. आज लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावलेली आहे. ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण कसे करणार ते आधी सांगा असा सवाल लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केला आहे.

हे ही वाचा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss