spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सगेसोयरे’ संदर्भातील आरक्षणाचा मुद्दा टिकणार नाही: Prakash Ambedkar

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा आज (शुक्रवार, २६ जुलै) कोल्हापूर येथे पोहोचली आहे. आरक्षण बचाव यात्रेदरम्यान कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. याअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठे विधान करत, “सगेसोयरे यांच्या संदर्भातील आरक्षणाचा मुद्दा टिकणार नाही,” असे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्ष बैठक बोलावले होते. जरांगे पाटील यांचे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण मिळावा. या बैठकीला अनेक जण अनुपस्थितीत होते. म्हणून वंचित बहुजन आघाडीची आम्ही भूमिका मांडली. महाराष्ट्राचे वातावरण गढूळ आणि विभक्त होत आहे. राजकीय नेते पक्षांच्या भूमिकेपेक्षा आपल्या समाजाचा विचार करत आहेत अशी भावना लोकांमध्ये आहे. भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलत असताना कायस्थ ब्राम्हण आहेत असं वाटत आहे किंवा जरांगे पाटलांच्या मागणीकडे उदासी आहे असे वाटत आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसींना उमेदवारी नाही. लोकसभेचे झालं तीच परिस्थिती आहे. विधानसभेमध्ये होणार आहे का अशी लोकसभेची स्थिती झाली तिच परिस्थिती विधानसभेमध्ये होईल अशी चर्चा ओबीसी मध्ये आहे. लोकसभेनंतर आत्ताची परिस्थिती चिघळत चालली आहे. पूर्वी राज्यात शरद पवारांच सरकार आलं होतं, त्यावेळी दंगली झाल्या होत्या.आत्ताही कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. बदल हा निश्चित आहे बदलच तोंडावरती या दंगली होत आहेत का असं प्रश्न आहे. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत ही परिस्थिती बेकाबू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे. आजच्या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती म्हणून आज पासून आम्ही आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर रक्तपात व्हावा असं आम्हाला वाटत नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “तुम्हाला नाही तर कोणालाच नाही या जरांगे पाटलांच्या वाक्यातून अनेक अर्थ निघाले आहेत. त्यातले काही वक अनर्थ वास्तव्यातील येतील अशी परिस्थिती आहे.असताना OBC ना भीती वाटत आहे. शंभर ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजेत असं आवाहन आम्ही करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन पक्ष यांच्यावरील आता हळूहळू मराठा समाजाचे आहेत असं शिक्का लागलेला आहे. आरक्षणावर ते कुठलीही भूमिका घेत नाहीत ते टाळतात मध्ये करत आहेत. ते जरांगे पाटलांच्या भूमिके विषयी काहीच बोलत नाहीत. आरक्षणा संदर्भात वस्तुस्थिती लोकांना कळण्यासाठी आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढत आहे. जिल्ह्यांमध्ये यात्रा काढणार आहोत सात ऑगस्टला याची सांगता औरंगाबाद मध्ये होईल. सगे सोयरे यांच्या संदर्भातील आरक्षणाचा मुद्दा टिकणार नाही बग्याची भूमिका घेत आहे,” असे ते म्हणाले.

 

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole यांनी Maratha Reservation प्रश्नी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा… Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss