spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खाद्यातेलांच्या किमतींबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात महागाईने शिखर गाठले आहे. केंद्र सरकार विरुद्ध संसदेत आंदोलन केली जात आहे. आज काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महागाई व बेरोजगारीबाबत नरेंद्र मोदींवर निशाण साधला आहे. अशातच आता मोदी यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सर्व खाद्य तेल संघटनांना खाद्यतेलाच्या किमतीत 15 रुपये प्रतिलीटरने तात्काळ कपात करण्याचे निर्देश दिल्याचे दिले आहे. याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली. उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व खाद्य तेल संघटनांना खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत रुपये प्रतिलीटरने तात्काळ कपात करण्याचे निर्देश दिल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.

हेही वाचा : 

काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमतीत घसरण होत असली तरी,सणसमारंभवेळी त्यात श्रावण चालू झाल्यामुळे तेलाच्या किमतीत आणखीनच कमी होणे जनतेच्या फायद्याचे ठरणार आहे. जागतिक बाजारातील वाढीमुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत सुधारणा झाली आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून खाद्यतेलाच्या दारात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

Latest Posts

Don't Miss