PM मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळासह, अनेक ७५,००० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

PM मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळासह, अनेक ७५,००० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी सकाळी नागपुरात आगमन झाले असून, नागपूर- बिलासपूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.तसेच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल. पंतप्रधान रस्ते मार्गाने ९.४० वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहचले. मोदी यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडा दाखवला. यानंतर मेट्रो फ्रिडम पार्क स्टेशनमधील प्रदर्शनीची पाहणी करून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास करतील.

हेही वाचा : 

Dayanand Shetty : CID टिव्ही शो मधील प्रसिद्ध कलाकारासाठी आज खास दिवस

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. ७५,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनीच जुलै २०१७ मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

Exit mobile version