रितेश-जेनेलियाला मोठा धक्का! भुखंड प्रकरण भोवणार

रितेश-जेनेलियाला मोठा धक्का! भुखंड प्रकरण भोवणार

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ऍग्रो कंपनीची चौकशी होणार आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड दिल्याचा आरोप भाजपाने केला होता. सहकार मंत्री अतूल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लातूरमधील भुखंड प्रकरण हे त्यांना भोवणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप भाजपनं केले होते. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. लातूरमधील १६ उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं (BJP) केला गेला होता. लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेनं त्यांना ११६ कोटींचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला गेला असा सवालही यानिमित्तानं समोर आला आहे.

हेही वाचा : 

Akshaya-Hardeek Wedding लगीन घाई झाली सुरु ! ‘या’ दिवशी राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार

रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला अवघ्या एका महिन्यात १२० कोटींचे कर्ज कसे देण्यात आले आहे. ते कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. एका मराठी वृत्त वाहिनीनं व्हायरल केलेल्या बातमीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

रितेश-जेनेलिया यांना चौकशी आदेश दिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत काही क्षणात पोहोचते. आता रितेश आणि जेनेलिया वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल चिंता वाटत.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स

रितेश आणि जेनेलिया यांचा आगामी सिनेमा

रितेश आणि जेनेलिया लवकरच ‘वेड’ (ved) सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘वेड’ सिनेमातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे, तर जेनेलिया मराठी सिनेसृष्टी पाय ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं. सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात.

भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पद मुक्त होण्याचे संकेत

Exit mobile version