आरे वसाहतीत आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक…

यंदाही आरेतील २७ पाड्यांतील आदिवासी बांधव मंगळवारी आदिवासी दिन साजरा करणार

आरे वसाहतीत आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक…

Aarey Adivasi

मुंबई: दरवर्ष ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील आरे हा एक असा एक भाग आहे, जिथे अजूनही आदिवासी वसाहती बऱ्यापैकी आहेत. आरे वसाहतीमधील युनिट क्रमांक ५, आरे मार्केट येथून सकाळी १०.३० वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि बिरसा मुंडा चौक येथे ही मिरवणूक संपेल. तसेच या मिरवणुकीत आदिवास्यांच्या पारंपरिक संगीताचा, नृत्याचा आणि गीतांचा समावेश असणार आहे. मिरवणुकीच्या माध्यमातून लोकांना विविध संदेश देण्याचा आणि तसेच मेट्रो -३ च्या कारशेडला विरोध करण्याचा या मिरवणुकीचा उद्देश आहे.

आरे कॉलोनीतील आदिवासी पाड्यातील लोक दरवर्षी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट हा दिवस अगदी एखाद्या सणासारखा साजरा करतात. मात्र कोरोनामुळे या समारंभावर पूर्णविराम लागला होता. पण यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे हा सण पुन्हा एकदा साजरा करण्यात येणार आहे. यंदाही आरेतील २७ पाड्यांतील आदिवासी बांधव मंगळवारी आदिवासी दिन साजरा करणार असल्याची माहिती आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जल, जंगल आणि जमीन हेच आमचे आयुष्य आहे. विकासाच्या नावावर आमच्याकडून ते हिसकावून घेऊ नका, असा संदेश मंगळवारच्या मिरवणुकीतून सरकारला आणि लोकांना देण्याचा प्रयत्न या समितीच्या पदाधिकाऱयांकडून करण्यात येणार आहे.

Exit mobile version