मुंबईत रविवारपासून जमावबंदी

मुंबईत रविवारपासून जमावबंदी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक, तसेच पुढील आठवड्यात येऊ घातलेली दिवाळी या बाबी विचारात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईत १६ ते ३० ऑक्टोबर या काळात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त संजय लाटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून याबाबत बुधवारी आदेश दिले. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त संजय लाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींनी १६ ते ३० ऑक्टोबर या काळात एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तींची कोणतीही मिरवणूक काढू नये. कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बॅण्ड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, ३० ऑक्टोबरनंतर या आदेशाची मुदत संपली तरी, कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. तसेच, ती सुरू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा आणि अंत्ययात्रा, तसेच कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे, आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायटया आणि संघटनांच्या सामान्य व्यवहारासाठी त्यांची बैठक, चित्रपटगृह, नाट्यगृह, शैक्षणिक संस्थामध्ये किंवा त्याच्या आसपास संमेलने, कारखाने, दुकाने आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने, परवानगी घेतलेल्या मिरवणुका यांना जमावबंदीच्या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

 

हे ही वाचा :

Karwa Chauth 2022 : सौभाग्याच्या रक्षणासाठी केले जाते ‘करवा चौथ’चे व्रत, जाणून घ्या

वनविभागाला मोठे यश; १३ बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version