Monday, June 24, 2024

Latest Posts

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

मी जनतेची सेवा करण्यास आणि लोकशाहीच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करण्यास व ते अबाधित ठेवण्यास सदैव तत्पर राहीन.

१८ व्या लोकसभेचं (18 loksabha first session) अधिवेशन आज २४ जून पासून सुरु झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारचं पहिलच अधिवेशन सुरु झालं. अधिवेशनाआधी देशाला मजबूत करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला. यंदा नवनिर्वाचित खासदारांनी पहिल्यांदाच लोकसभेच्या दालनात पाऊल टाकलं. महाराष्ट्रातील प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), रक्षा खडसे (Raksha Khadse), मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) या नवनिर्वाचित खासदारांनी आज २४ जून रोजी संसद भवनात शपथ घेतली. शपथविधीबाबत ईशान्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत त्यांच्या भावना मांडल्या आहेत.

प्रवास तोच, वळण नवे..! आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक मैलावरचा मोठा टप्पा आहे. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या विचाराची आणि समाजसेवेची शिदोरी सोबत घेऊन १८ व्या लोकसभेची सदस्य म्हणून पदार्पण केल्याचा बहुमान मला मिळाला ही माझ्यासाठी अतिशय गौरवपूर्ण बाब असल्याचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या.

तमाम मान्यवरांच्या दूरदृष्टी आणि बलिदानाला नमन करते…

संसद हे आपल्या लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला सर्वाधिकार देण्याच्या स्वप्नाचा मी एक घटक बनलेय यासाठी कृतज्ञ आहे. ज्या सभागृहाच्या कामकाजातून आजवर हा आपला देश घडत आला आहे, त्या संसदेचा एक भाग बनणे.. माझ्यासाठी याहून मोठा कोणताही सन्मान नाही. मी संविधान तसेच माझ्याआधी या संसदेचा भाग बनलेल्या त्या तमाम मान्यवरांच्या दूरदृष्टी आणि बलिदानाला नमन करते, ज्यांनी या राष्ट्राला आकार दिला आणि आपण जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र बनू याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

ही संधी मिळणे हे माझे भाग्यच…

मी जनतेची सेवा करण्यास आणि लोकशाहीच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करण्यास व ते अबाधित ठेवण्यास सदैव तत्पर राहीन. ही संधी मिळणे हे माझे भाग्यच आहे. मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या मार्गावर चालण्याचे आणि लोकशाहीच्या सर्वोच्च आदर्शांचे पालन करण्याचे वचन देते, असे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटले.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss