spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोल्हापूरमध्ये आंदोलक आक्रमक, पोलिसांचा कडक बंदोबस्त

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत.

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्याचबरोबर आज कोल्हापूर बंदीची हाक देण्यात आली आहे. चित्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. संबंधितां विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे मटण मार्केटमध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला आहे. परंतु शिवाजी चौकामध्ये जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर शहरांमध्ये रॅली काढवण्यावर त्यांचे मत ठाम आहे.

पोलिसांनी रॅलीसाठी विरोध केला आहे आणि पोलीस म्हणाले आहेत की, या ठिकाणी जितक्या वेळ आंदोलन करायचं ते करा असे आवाहन केले आहे परंतु आम्ही रॅलीला परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे परंतु हिंदुत्ववादी आंदोलन ठाम ठेवण्याची भूमिका आहे. कोल्हापूरमध्ये अत्यंत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिवाजी चौकच्या परिसरामध्ये सर्व दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले आहेत. याचदरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की कोल्हापूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहरामधील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी परिस्थिती शांततेत आहे.

कोल्हापूरमध्ये बंदी आदेश आहेत तरीसुद्धा आंदोलन होत आहे तेव्हा त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काळ त्यांनी ठिय्या आंदोलन करणार आहे असे त्यांनी सांगितले. आम्ही याबाबतीत रिस्पॉन्स करत आहोत विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना केली आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

बारावीनंतर नाही तर दहावीनंतर करता येतील हे Diploma; जाणून घ्या सविस्तर

डाळ भात खाऊन आलाय कंटाळा ? मग बनवा घरच्या घरी हॉटेल स्टाईल Dal Khichadi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss