Saturday, July 6, 2024

Latest Posts

Pune Car Accident: Maha Govt चा आपल्या बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न, Nana Patole यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी पुणे कार अपघात (Pune Car Accident) प्रकरणावर सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी काल (बुधवार, २९ मे) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुणे कार अपघात (Pune Car Accident) प्रकरणावर भाष्य करत, ‘याप्रकरणी राज्य सरकार (Maharashtra Government) लपवालपवी करून बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा गंभीर आरोप केला आहे. तसेच, याप्रकरणी सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

मुंबईतील टिळकभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Hit and Run Case) राज्य सरकार लपवालपवी करून बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, त्यांच्याकडे भाड्याची गाडी आहे, त्याचे महिन्याचे भाडे लाखात आहे. डॉ. सापळे या मिरज हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी केलेले कारनामे सर्वांना माहित आहेत. असा भ्रष्ट अधिकारी निष्पक्ष तपास कसा काय करु शकतो? या प्रकरणातील डॉक्टर, पोलीस व राजकीय नेत्यांना वाचण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे.”

ते पुढे म्हणाले, “पुणे अपघात प्रकरणी कोणत्या मंत्र्याने फोन केले, त्या गाडीत कोण कोण होते, त्यांची नावे का पुढे येत नाहीत? सरकार लपवालपवी कशासाठी करत आहे? ज्या पबमधून ही मुले निघाली त्यावेळी दोन गाड्या होत्या, त्यांनी गाड्यांची रेस लावली होती व त्यातूनच हा अपघात झाला व दोघांना चिरडले. ससून हॉस्पिटमधील डॉ. तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले, यासाठी डॉ. तावरेंना कोणी फोन होता? गाडी का बदलण्यात आली? त्या पबमध्ये एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण? हे राज्य सरकारने स्पष्ट केले पहिजे. डॉ. तावरे यांनीच सर्वांची नावे उघड करेन असे सांगितल्याने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे सरकारने डॉ. तावरेंना सुरक्षा दिली पाहिजे. या प्रकरणात डॉ. तावरे महत्वाचा धागा आहेत, तो महत्वाचा पुरावा आहे,” असेही नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असताना CM Eknath Shinde मात्र सुट्टीवर: Nana Patole

स्टंटबाजीच्या नादात बाबासाहेबांचा अपमान, नाक घासून माफी मागा; Amol Mitkari यांची Jitendra Awhad यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss