Saturday, July 6, 2024

Latest Posts

Pune Car Accident: केस अंगावर घेण्यासाठी आरोपींकडून ड्रायव्हरवर दबाव; पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे येथील कार अपघात प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (शनिवार, २५ मे) रोजी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी या केसबाबत मोठी अपडेट देत आरोपींकडून ड्रायव्हरवर केसची जबाबदारी अंगावर घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचे सांगितले.

पुणे येथील कार अपघात प्रकरणी (Pune Car Accident) पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आज (शनिवार, २५ मे) रोजी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी या केसबाबत मोठी अपडेट देत आरोपींकडून ड्रायव्हरवर केसची जबाबदारी अंगावर घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच त्याबदल्यात ड्रायव्हरला बक्षिसाचे आमिषही दाखवण्यात आल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “या केस मधील पुर्ण घटना क्रम पाहण्यात आला तर त्या दिवशी रात्री ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी ड्राव्हवर दबाव टाकण्यात आला. कि त्यांनी स्वत: त्यांच्या अंगावर या केसची जवाबदारी घ्यावी. जेव्हा तो पोलिस स्टेशनला आला होता तेव्हा पहिल्या जवाबात त्यांनी तसं सांगितले होते. परंतु त्यावेळी पोलिसांनी सगळ्या गोष्टीची खात्री केल्याने मुलगा गाडी चालवत असल्याची खात्री झाली होती म्हणुन त्यावर गु्न्हा दाखल झाला होता.”

“तरी ड्राव्हवर तो आग्रह धरुन बसला होता, कि तो स्वत: गाडी चालवत होता. रात्री अकरा वाजताच्या सुमारास ड्राव्हरला स्टेशन वरुन सोडण्यात आले त्यावेळी आरोपी ड्राव्हरला त्यांच्या घरी घेऊन गेले. आरोपीनी त्याचा मोबाईल त्याच्या ताब्यात ठेवला आणि त्याला डाबुन ठेवण्यात आले, आम्ही सांगु त्या प्रमाणे जवाब द्यायचा असे त्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी ड्राव्हवरची बायको आणि घरचे आरोपीच्या घरी आले आणि तिथे त्यांनी आरडा ओरडा करुन शेवटी त्याला घेऊन गेले. त्या नंतर ड्राव्हवर अत्यंत घाबरला परवा त्याला शोधुन क्राईम ब्रांच मध्ये आणले आणि त्याचा जवाब घेण्यात आला. काल कलम ३४२, ३६५, ३६८ लावण्यात आला आहे. त्यांना आज कोर्टात घेवुन जाणार आहे. दुसरा आरोपी कस्टडी मध्ये असल्याने त्याची पण चौकशी करुन कोर्टात प्रोड्युज करण्यात येईल. ड्राव्हवरला सांगण्यात आले कि गुन्हा तुझ्या अंगावर घे, तुला आम्ही गिफ्ट देऊ,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis हे सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री: Atul Londhe

दुष्काळाबद्दल आचार संहितेचे बहाणे करु नका, तातडीने उपाययोजना करा: Nana Patole

 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss