Saturday, July 6, 2024

Latest Posts

Pune Car Accident: पुण्यातील पब, बारमध्ये अवैध प्रकार सुरु; Sushma Andhare, Ravindra Dhangekar यांचा आरोप

पुणे अपघातप्रकरणामुळे शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुणे अपघातप्रकरणामुळे (Pune Car Accident) राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. याप्रकरणात पुणे महानगरपालिकेकडून (PMC) संबंधित बारवर हातोडा घालण्यात आला होता. पण आता शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यावेळी समाजमाध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “पुणे महानगरपालिकेलने परवाने दिल्या शिवाय बार चालले कसे? सगळे पब सकाळच्या चार वाजे पर्यंत चालु असतात. याच पुणे पोलिसांना कायतरी वाटलं पाहिजे. आम्ही या सगळ्या बाबत आवाज उठवणार, त्यामुळे पोलिसांना आमच्यावर जी काही अॅक्शन घ्यायची आहे ती घेऊ द्या. या सगळ्या प्रकणामध्ये आम्ही पुणेकरांना नेसणाभुत होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणी बार मध्ये वसुल्या केल्या जात आहे, आमच्या कडे सगळे पुरावे आहे आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. सरकार काही करुद्या आम्ही रस्त्यावर उतणार. आम्ही सातत्याने समाजाच्या हिताचे काम केलं आहे.”

याप्रकरणावरून शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “मागच्या वेळेला ललित पाटीलचं जे प्रकरण झालं तेव्हा आम्ही ते मांडायला गेलो तेव्हा मंत्री शंभुराज देसाई यांनी आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ,केस टाकण्याची भाषा केली. आता त्यांच काय म्हणंण असेल. ललित पाटील यांच्या प्रकरणावेळी आम्ही अजय तावरे यांच नाव घेतलं तेव्हाचं त्यांना अटक करणं गरजेचं होतं. अजय तावरे, संजीव ठाकुर यांच्या अटकेची आम्ही जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला होता.”

पुणे कार अपघातप्रकरणी दिवसेंदिवस नवीन माहिती मिळत असून आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (CBI) ससून रुग्णालयातील (Sasoon Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टर्सना ताब्यात घेतले आहे. आपल्या पोर्शे कारने दोन जणांना चिरडणाऱ्या बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा नियम कायदे मोडून कशाप्रकारे कामाला लागली याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. गुन्हे शाखेने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टर्सना ताब्यात घेतलं असून कायदयाच्या तावडीतून बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप या डॉक्टर्सवर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या डॉक्टर्सना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजार करण्यात येईल.

हे ही वाचा:

Pune Car Accident: त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, Ravindra Dhangekar यांची प्रतिक्रिया

Pune Car Accident: CBI कडून ससूनमधील दोन डॉक्टर्सना अटक, आरोपीला वाचवण्यासाठी केला मोठा फेरफार!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss