spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune: पुणेकरांचा लाडका ‘भिडे पुल’ गेला पाण्याखाली; अनेक वाहने अडकली

खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी 26 हजार 809 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला.

पुणे: गेल्या कित्येक दिवसांपासून गायब झालेल्या अखेर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री केली आहे. धो – धो पडणाऱ्या या पावसामुळे मुंबई, कोकण, ठाणे सारख्या अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आले होते. मुंबईत बरसून मुंबईची तुंबई केल्यानंतर पावसाने आता हजेरी लावली आहे ती पुण्यात आणि या पावसामुळे पुणेकरांचा लाडका आणि पुण्यातील जुना पूल भिडे पूल या अतिमुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली आहे.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी 26 हजार 809 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. विशेष म्हणजे पूर आल्याने नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचड हाल झाले. नदी पात्रात अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी चालकांची प्रचंड धावपळ झाली. तर काहींच्या गाड्या या वाहून देखील गेल्या. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार ८०९ क्यूसेक्स करण्यात आला.

दुसरीकडे कोल्हापूरातील तुळशी धरण परिसरात आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने धरण ९३ टक्के भरले असून धरणाच्या तीन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.

मुसळधार पाऊस पडल्यावर दरवेळीच भिडे पुलाची हि हालत असते असे तिथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विनोदी मिम्सना उधाण आलाय.

Latest Posts

Don't Miss