Pune Rain Update: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. पुण्यात (Pune) देखील परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं आहे.

राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांचा चांगलीच धावपळ झाली. अनेक भाग पाणी शिरलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारीपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे.

तसेच परतीच्या मुसळधार पावसाने आज पुन्हा पुणे शहराला चांगलंच झोडपून काढले, तास दिड तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पुणेकर पावसात अडकून पडलेत. रस्त्यांवर वाहतूक कोडींही मोठ्या प्रमाणवर पाहायला मिळत आहे. पण वाहतूक पोलिस मात्र कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूकीवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे. अशावेळी नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर कोणीही नसल्याने ते हतबल झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस प्रमुख कुठे आहेत? असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जातोय.

तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होतं. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले होते. अनेक दुचाकी, रिक्षा यावेळी पाणी गेल्याने बंद पडल्या. त्यामूळे वाहन वाहन चालकांवर वाहने पाण्यातून ढकलत नेण्याची वेळ आली. पाण्यात अडकलेल्या वाहनचालकांना मदतीचा हात दिला. दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर आकाशवाणी केंद्राजवळ झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Exit mobile version