पुण्यातील भाजप नेत्याने उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेखाली आत्महत्या करत संपवले जीवन

पुण्यातील ३५ वर्षीय भाजप नेत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

पुण्यातील भाजप नेत्याने उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेखाली आत्महत्या करत संपवले जीवन

पुण्यातील ३५ वर्षीय भाजप नेत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. भाजपचे युवा मोर्चाचे (Bharatiya Janata Yuva Morcha ) प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ (Sunil Dhumal) यांचा मृतदेह हडपसर (Pune, Hadapsar) जवळील रेल्वे ट्रॅकवर दिसला. या घटनेमुळे पुण्यात सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ३५ वर्षीय सुनील धुमाळ यांनी यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी घडली. तसेच धुमाळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्याठिकाणी मृतदेह मिळाला तिथे कोणतीही सुसाईड नोट अथवा चिट्टी आढळून आलेली नाही.

रेल्वे पोलीस ( Government Railway Police ) अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले , मंगळवारी सकळी आठ वाजण्याच्या सुमारास या घटनेसंदर्भात माहिती मिळाली.त्यानंतर घटनास्थळावर जाऊन पाहणी करून चौकशी केल्यानंतर मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील धुमाळ असल्याचे सामोरे आले. चालत्या ट्रेनने धडक दिल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे हा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सुनील धुमाळ यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. याचा पुढील तपास हडपसर पोलीस आणि रेल्वे मार्ग पोलीस करत आहेत. हडपसर येथील साडेसतरानळी येथील रेल्वे रुळावर धुमाळ यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ही आत्महत्या आहे की अपघाती मृत्यू हे अद्याप अस्पष्ट असल्याचे लोहमार्ग पोलीसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.दरम्यान, धुमाळ यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरामधील साडेसतरा नळी परिसरात ते राहायला होते.

पुणे जीआरपीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले हा प्रथमदर्शनी अपघात वाटत आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील धुमाळ यांनी सकाळी आपल्या मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडले. घरी पुन्हा जात असताना त्यांनी आपली दुचाकी रेल्वे लाईनवरील एका फाटकाजवळ उभी केली. शेवटचे फोनवर बोलताना ते रेल्वे लाईनच्या शेजारी चालताना दिसले. त्याच वेळी त्यांना रेल्वेचा धक्का लागला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असेल असा अंदाज अधीक्षक दोषी यांनी सांगितले.

Exit mobile version