spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील हडपसरमध्ये डंपरने आईसमोर मुलाला चिरडले, मुलाचा जागीच मृत्यू

राज्यभरात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

राज्यभरात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. एका डंपरने अॅक्टिव्हाला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर झाली. बुधवारी संध्याकाळच्या वेळेस हडपसर येथे ही घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडी चालवत असल्यामुळे मुलाची आई गंभीररित्या जखमी झाली आहे. जखमी आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पण संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तसेच चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचे वय सात वर्ष आहे. शौर्य सागर आव्हाळे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. डंपरने अॅक्टिव्हाला धडक दिल्यानंतर लहान मुलगा डंपरच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हडपसर परिसरातील या धक्कादायक घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात घडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी डंपर जाळून टाकला आहे. या घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाची गाडी देखील घटना स्थळी पोहचली. पोलिसांनी जमावाला बाजूला केल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवली. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकमध्ये देखील मागील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. या अपघातामध्ये इनोव्हा क्रिस्टा कारने एका दोन वर्षाच्या मुलाला चिरडले होते. यामध्ये त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. बसव चेतन पाटील असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गांधीगंज पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चालकाची १० टक्के चूक आहे पण आई वडिलांनी मुलाकडे लक्ष द्याल हवे होते असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

पराभवानंतर उभारी घेण्याची वृत्ती खेळ शिकवतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्यासोबत आहोत – आमदार बच्चू कडू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss