Pune Covid News पुणेकरांनो सावधान! सिंगापूरहून आलेला प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Pune Covid News पुणेकरांनो सावधान! सिंगापूरहून आलेला प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

चीनसोबतच जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारत सरकारही अलर्ट मोडमध्ये आहे. केंद्र सरकारने कोविड संसर्गाचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांच्या निर्यातीवर देखरेख सुरू केली आहे जसे की पीपीई किट, मास्क, व्हेंटिलेटर आणि पॅरासिटामॉल सारखी काही औषधे. कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या उद्देशाने सरकारचे पाऊल आहे. अशातच आता महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यात सिंगापूरहून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Pune Covid News) निघाला आहे.

हेही वाचा : 

बॉलिवूडवर पसरली शोककळा; ‘रेडी’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

पुणे विमानतळावर (Pune Airport) उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय प्रवासादरम्यान आणि विमानताळावर मास्क वापरण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोथरुड परिसरातील ३२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. या महिलेला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आहे. त्यामुळे त्यांंच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांंनी दिली आहे. काळजी करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यात (Pune) सध्या कोरोनाचे ५४ (Covid Update) पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Pathaan पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री, दीपिकाच्या भगव्या बिकिनीसह चित्रपटातील सीन कट

पुढील ४० दिवस निर्णायक

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणारे चाळीस दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. जानेवारीमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. चीनमध्ये वाढत्या कोविड प्रकरणांमुळे, भारतातील लोकांमध्ये नवीन लाटेबद्दल चिंता आहे. सरकारने आधीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तयार राहण्यास सांगितले आहे. वाढत्या कोविड प्रकरणांमुळे, आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 2 टक्के प्रवाशांची कोरोनाव्हायरस चाचणी (coronavirus test) अनिवार्य करण्यात आली आहे.

Nagpur मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रेशीमबागेत दिली भेट

Exit mobile version