spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबागेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.

नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबागेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती स्मारकाला भेट देऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांवर चालणारे आणि विकासाचा ध्यास घेतलेले असे आमचे हिंदुत्त्व आहे. हाच हिंदुत्वाचा विचार अंगिकरून शिवसेनेचे मार्गक्रमण पुढे सुरू असून त्याच विचारांवर चालणारे आमचे सरकार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आल्यावर इथे आवर्जून इथे भेट देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. इथे आल्यावर अलौकिक शांतता आणि ऊर्जा मिळत असल्याचेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध दर्शविला असला तरीही महाराष्ट्रात अनेक जाती आणि धर्माची लोकं एकत्र राहतात. त्यांच्यात जातीय सलोखा कायम रहावा हीच सरकारची भूमिका आहे. जातीनिहाय जनगणेची मागणी होत असली तरीही याबाबत समाजातील सर्व घटकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यानुसार सरकार योग्य तो निर्णय घेईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार संजय रायमूलकर, आमदार ज्ञानराज चौगुले हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन! गेल्या २४ तासांत केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू तर २९२ रुग्णांची नोंद

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss