पुण्यातील महिला पोलीस सोबत ओळख करून तिच्यावर केला अत्याचार…

पुणे (Pune) शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण आता याच पुण्यात मागील काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

पुण्यातील महिला पोलीस सोबत ओळख करून तिच्यावर केला अत्याचार…

पुणे (Pune) शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण आता याच पुण्यात मागील काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. भर रस्तामध्ये वार करून हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका पोलीस शिपायाने ओळख वाढवून महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. महिला पोलसांनी या घटनेची पोलिसात जाऊन तक्रार केली. दीपक मोघे असं या कर्मचाऱ्यांचं नाव आहे.

शिपाई आणि महिला पोलीस हे दोघंही पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. ते दोघंही एकाच वसाहतीत राहायला आहेत. लॉकडाऊनच्या काळात दीपिका मोघे आणि महिला पोलीस यांची चांगली ओळख वाढली. त्यानंतर एक दिवस महिला पोलिसने दीपिक मोघे याला घरी जेवायला बोलावले. आणि त्यानंतर त्याने कोल्ड्रिंकमधून महिलेला गुंगीचं औषध दिलं. त्यामुळे उलट्या आणि त्रास होत असल्याने फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्याने गोळ्या खाण्यास दिल्या. आणि गुंगी आल्यानंतर तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि आणखी गुंगी येऊन तिला झोप लागली. झोप लागल्यावर महिला कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सगळ्याचा शिपायाने व्हिडिओ बनवला. हा सर्व प्रकार महिलेला समजल्यानंतर तिने या गोष्टीचा जाब विचारला. त्याशिवाय तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. त्या शिपायाने महिला पोलिसला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.दीपक मोघे याने घरातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही चोरले. लॅपटॉप, डोंगल आणि मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. या सर्व त्रासाला कंटाळून महिला पोलिसने पोलिसात जाऊन तक्रार केली.

यापूर्वी पुण्यात असा प्रकार याआधी घडला आहे. पुस्तक खरेदी करण्यासाठी आलेल्या एका मुलीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एवढंच नाही तर मुलीला विवस्त्र करुन तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ लाख ८६ हजार रुपये उकळले होते. आजकाल पुण्यात असे प्रकार घडण्याच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

हे ही वाचा: 

Exit mobile version