Friday, September 27, 2024

Latest Posts

एक्स रे काढण्याचा बहाना करत आरोपी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाला

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेश द्वारात रविवारी अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर ड्रग्ज रॅकेटची तस्करी करणारा ललित पाटील आता पोलिसांच्या ताब्यातून निसटला आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेश द्वारात रविवारी अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर ड्रग्ज रॅकेटची तस्करी करणारा ललित पाटील आता पोलिसांच्या ताब्यातून निसटला आहे. यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत. ललित पाटील हा अमली पदार्थांची तस्करी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याचे मोठे मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले असून तो आता पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

दोन दिवसापूर्वी पुण्यातील चाकण भागातून पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटील याला पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्याला येरवडा जेल मध्ये ठेवण्यात आले होते. कारागृहात गेल्यानंतर पोटाचा आजार झाला असल्याचा बनाव केला आणि त्याला तीन महिन्यापूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कैद्यांसाठी असलेल्या वॉर्ड नंबर १६ मध्ये ठेवण्यात आले होते. या १६ नंबरच्या वॉर्ड बाहेर पोलिसांचा पहारा नेहमीच असतो. ससून रुग्णालयातील कर्मचारी रौफ शेख आणि येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल यांना हाताशी धरुन ललित पाटीलने ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमधून ड्रग्ज रॅकेट चालवायला सुरुवात केली. त्यानंतर रविवार सकाळी ससून रुग्णालयाच्या गेटवर सुभाष मंडल आणि रौफ शेख यांना दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन हे अमली पदार्थ सापडले. त्यानंतर ललित पाटील याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या नवीन गुन्ह्यात ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला. मात्र सोमवारी एक्सरे काढण्यासाठी ससूनच्या एक्स रे विभागात पोलीस त्याला घेऊन गेले आणि त्यानंतर तो तिकडून पळून गेला. यामुळे ससुन रुग्णालयाचे प्रशासन, पुणे पोलीस आणि येरवडा कारागृहात प्रशासन या सगळ्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून पुण्यात अनेक ठिकाणी ड्रग्जची तस्करी करण्यात आली आहे. पुणे परिसरातून तब्बल ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील काही रहिवाशांना अटक करण्यात आली. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने केली आहे.

Latest Posts

Don't Miss