Wednesday, September 25, 2024

Latest Posts

पुण्यातील ६० गणेश मंडळांवर होणार कारवाई, ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल

पुण्यातील गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि आनंदात झाले. यावेळी डॉल्बी सिस्टीम मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्या होत्या.

पुण्यातील गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि आनंदात झाले. यावेळी डॉल्बी सिस्टीम मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्या होत्या. या डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे पुण्यातील ६० पेक्षा जास्त मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. असा अहवाल पोलीस ठाण्यानी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवला आहे. विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ७ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये चंदन नगर मधील विनायक तरुण मित्र मंडळावर ११९.५ डॉल्बीचा आवाज असल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मी रोड, केळकर रोड, टिळक रोड कुमठेकर रोड या चार मंडळांची गणपती विसर्जन मिरवणूक रस्त्यावरून निघते. फरासखाना, विश्राम बाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे चारही रस्ते येतात. या विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या पातळीचा भंग करून कर्कश आवाजात डीजे वाजवल्यामुळे मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच या आवाजाचा अनेक लोकांना त्रास देखील झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी नॉईज लेवल पथकाला बोलवून आवाज चेक करण्यासाठी सांगितले. त्यानंतर डीजेची तीव्रता देखील मोजण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक जास्त आवाज असलेल्या मंडळाच्या आणि डीजे चालकाच्या नावांची यादी बनवण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यामुळे गणपती मिरवणुकीत पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पण आता गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीत २० आणि ईद मिरवणुकीत २ असे २२ अहवाल तयार करण्यात आले आहेत. तसेच विश्राम बाग पोलिसांनी १० आणि खडक पोलिसांनी १५ असे अहवाल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय चंदनवाडी, कोथरूड, येरवडा, हडपसर येथील मंडळांवर देखील गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा: 

‘स्वदेस’ अभिनेत्री गायत्री जोशीचा भीषण अपघात, लॅम्बोर्गिनीची फेरारीशी टक्कर…

सिक्किममध्ये ढगफुटी, लष्कराचे २३ जवान बेपत्ता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss