दिल्लीनंतर आता पुण्यातील कॉलेजमध्ये प्रदर्शित झाली मोदींवरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरी

या प्रकरणी एफटीआयआयचे रजिस्ट्रार सईद रबी हाश्मी यांनी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांच्या एका गटाने माहितीपट दाखवल्याचे सांगितले आहे.

दिल्लीनंतर आता पुण्यातील कॉलेजमध्ये प्रदर्शित झाली मोदींवरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरी

पुणे फिल्म इन्स्टिट्यूट (FTII) विद्यार्थी संघटनेने आपल्या कॅम्पसमध्ये वादग्रस्त बीबीसी माहितीपट प्रदर्शित केला. विद्यार्थी संघटनेने शनिवारी ही माहिती दिली. FTII स्टुडंट्स असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २६ जानेवारी रोजी आम्ही FTII येथे प्रतिबंधित बीबीसी (BBC) माहितीपट ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ (Modi: The Modi Question) प्रदर्शित केला. या प्रकरणी एफटीआयआयचे रजिस्ट्रार सईद रबी हाश्मी यांनी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांच्या एका गटाने माहितीपट दाखवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली विद्यापीठ (Delhi University) आणि आंबेडकर विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच काँग्रेसने गुरुवारी केरळमध्ये हा माहितीपट दाखवला. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ट्विटर (Twitter) आणि यूट्यूबला (You Tube) माहितीपटाच्या लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. याला प्रचार सामग्री म्हणून संबोधून, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की त्यात तटस्थतेचा अभाव आहे आणि हा माहितीपट वसाहतवादी मानसिकता प्रतिबिंबित करतो. हा वादग्रस्त माहितीपट गोध्रा दंगलीवर आधारित आहे.

TISS विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंग केली रद्द

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमने भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र निषेधानंतर शनिवारी संध्याकाळी वादग्रस्त बीबीसी माहितीपटाचे (BBC Documentry)  स्क्रीनिंग रद्द केले. एका विद्यार्थी नेत्याने सांगितले की, टीआयएसएस (TISS) व्यवस्थापन आणि मुंबई पोलिसांच्या दबावामुळे प्रोजेक्टर कार्यक्रमस्थळी नेणे शक्य झाले नाही. माहितीपट सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. ते त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपवर तो पाहत आहेत.

हे ही वाचा:

आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत, मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

IND vs NZ, भारतासाठी करो या मरोचा सामना, ‘या’ खेळाडूंना मिळू शकेल सामन्यात खेळण्याची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version