Sharad Pawar भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे नेते: Amit Shah

Sharad Pawar भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे नेते: Amit Shah

पुणे येथे आज (रविवार, २१ जुलै) भाजप कार्यकारिणीची बैठक (BJP Meeting) पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी, त्यांनी उपस्थित भाजप (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar)पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत, ‘शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे नेते आहेत,’ असे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, “शरद पवार दूध पावडर आयात करणार असल्याचे सांगत आहेत, त्यांनी परिपत्रक काढले होते, पण मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात एक किलोही दूध पावडर आयात झाली नाही आणि पुढच्या पाच वर्षांत एक किलोही दूध पावडर आयात केली नाही. यापुढेही एक ग्राम देखील दुधाची पावडर आयात केली जाणार नाही. त्यांना गैरसमज पसरवून निवडणुका जिंकायच्या आहेत.”

ते पुढे म्हणाले, “हे लोक भ्रष्टचाराच्या गोष्टी करत आहेत. शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे नेते आहेत, याबाबत माझ्या मनात कसलीच शंका नाही. तुम्ही आमच्यावर काय आरोप करता? यादेशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थागत करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे.”

उद्धव ठाकरे यांच्यावर अमित शहा यांचा निशाणा

अमित शाह यांनी यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली. यावेळी ते म्हणाले, “या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत संबंधित आहे, पीएफआयला पाठिंबा देणाऱ्या आणि औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण करण्याच्या विरोधात असणाऱ्यांच्या सोबत ते उभे आहेत. हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करू शकतो. महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आल्यावर आम्ही मराठा आरक्षण आणू. जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्हाला मराठा आरक्षण मिळाले. मराठा आरक्षण चालू ठेवायचे असेल तर भाजपला विजयी करा!” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

मराठ्यांचा कचका कसा असतो, तुला दाखवतो: Manoj Jarange Patil यांचा Pravin Darekar यांना इशारा

आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठीच चित्रपट, Dharmaveer 2 वरून Sanjay Raut यांची CM Eknath Shinde यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version