पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, मनसे अधिकाऱ्यावरच केला गोळीबार

समीर थिगळे यांच्या कुटुंबाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार घडल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि त्याचबरोबर घराच्या आजूबाजूच्या परिसरात काहीसे घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, मनसे अधिकाऱ्यावरच केला गोळीबार

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) सातत्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच आता कोयता गॅंगनंतर पुण्यातील मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर कुणीतरी गोळी झाडल्याची घटना समोर येत आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या निवासस्थानासमोर हा सर्व प्रकार घडला आहे. कुख्यात गुंडांनी जरी हा गोळीबार केला असला तरी त्यांना कोणत्याही प्रकारची इजा न झाल्याचे समोर येत आहे. समीर थिगळे यांच्या कुटुंबाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार घडल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि त्याचबरोबर घराच्या आजूबाजूच्या परिसरात काहीसे घबराहटीचे वातावरण पसरले आहे. पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला असून त्यांनी या संबंधित छानबीन करायला सुरुवात केली आहे.

“मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, अशी धमकी समीर थिगळे यांना पिस्तूल रोखत काही दिवसांपूर्वी काही गुंडांनी दिली होती. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी देखील या गुंडांनी केली होती. समीर थिगळे यांच्यावर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.

कुख्यात गुंडानी समीर यांना इजा करण्यासाठी हा कट रचला होता. गुंडाने समीर यांच्यावर बंदूक रोखली असता, बंदुकीतून गोळी न सुटल्यांमुळे त्यांचा जीव बचावला. पण, मग त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी गोळी झाडली आणि तिथून पळ काढला. यावेळी समीर थिगळे यांचे कुटुंब घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा:

बिग बॉस मधील ‘या’ स्पर्धकाला मिळणार सिनेमात झळकण्याची संधी

ChatGPT शी स्पर्धा करणार गूगलचे फिचर, लवकरच होणार AI चॅटबोट लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version