Pune News विमान प्रवासासाठी पुणे विमानतळ व्यवस्थापकांकडून आवाहन, विमानतळावर आता ‘इतका वेळ’ आधी हजर राहा

Pune News विमान प्रवासासाठी पुणे विमानतळ व्यवस्थापकांकडून आवाहन, विमानतळावर आता ‘इतका वेळ’ आधी हजर राहा

पुण्यावरून विमानाने प्रवास करत असाल किंवा करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. लोहगाव विमानतळ प्रशासनाने याबाबत प्रवाश्यांना विशेष आवाहन केले आहे. डिसेंबर (New year) महिन्यात सणासुदीच्या काळात होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना या नव्या नियमांचे पालन न केल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. पुणे विमानतळावर वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाने नागरिकांना विमानतळावर तीन तास अगोदर येण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय ७ किलोपर्यंतची एकच बॅग जवळ ठेवावी अशा सूचना केल्या आहे.

हेही वाचा : 

Corona अजून संपलेला नाही, सतर्क राहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

यावर्षी पुणे-सिंगापूर (Pune-Singapore) आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे. २ डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु झाली असून, त्यासोबतच पुणे-बँकॉक सेवा सुरु झाली आहे. त्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विमानसेवा सुरु झाल्याने अनेक प्रवाशांना फायदा झाला आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनावर प्रवाशांचा मोठ्या (Pune Airport) प्रमाणात चेक इनचा ताण येत आहे. प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी दोन तास आधी पोहोचण्याचं आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

‘पठान’ चित्रपटाच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये शाहरुख खानला एक सुखद धक्का, काय ते जाणून घ्या

वर्षाच्या शेवटी आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून विमान प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, विमानांची संख्या वाढत चालली आहे. सणासुदीच्या काळात वाढलेल्या गर्दीमुळे चेकिंग (Pune Airline) साठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्याचे प्रशासनाने हे आवाहन केले आहे. गेला काही दिवसापासून पुणे विमानतळावर उड्डाणे वाढली असून प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यानंतर होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाने जगातील अनेक देशांमध्ये वाढला तणाव, भारताला देण्यात आला सतर्कतेचा इशारा

Exit mobile version