पुण्यात ७ दिवस ड्राय डे ? Chandrkant patil यांचं मोठं वक्तव्य

संपूर्ण पुण्यात एकूण ७ दिवस पब आणि बार पुर्णपणे बंद करण्यात यावे, अशी नियामवली आखली पाहिजे. असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.त्यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात पुढील ७ दिवस ड्राय डे लागू होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

पुण्यात ७ दिवस ड्राय डे ? Chandrkant patil यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाजप नेते चंद्रकांत पाटिल यांची प्रतिक्रिया

पुणे शहर हे सध्या पब आणि बारमुळे ज्या काही घटना घडत आहेत त्यावरु सध्या चर्चेत आहेत. पुण्यात सुरु असलेल्या घटनांवर ठोसपणे पाऊल उचलत त्यावर कारवाई केली पाहिजे.या सगळ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. तात्पुरता कारवाई न करता कायमस्वरुपी कारवाई करणं गरजेचं आहे. संपूर्ण पुण्यात एकूण ७ दिवस पब आणि बार पुर्णपणे बंद करण्यात यावे, अशी नियामवली आखली पाहिजे. असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant patil) यांनी केलं आहे.त्यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात पुढील ७ दिवस ड्राय डे लागू होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज अॅन्टी ड्रग्ज डे आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्जचं सेवन खुलेआम केले जात आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील सगळ्यांसमोर येत आहे. ७० लाख लोकसंख्येचं शहर पुणे शहर हे जवळ जवळ कामातून गेलं आहे. आणि पुणे शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पब आणि बार मुळे निर्माण होणाऱ्या समस्या  सोडवण्यासाठी सगळ्या पुणेकरांनी व्यासपिठावर येऊन नियामावली तयार केली पाहिजे. तुम्ही पब आणि बार किती वाजेपर्यंत चालू ठेवणार ? शरीरशास्त्राचा नियम आहे की, रात्री ११ ला झोपले पाहिजे. मग यांच्याबाबत तुम्ही रात्रभर दारु पिण्याची आणि अमली पदार्थ सेवन करण्याची परवानगी दिली आहे का ? असा सवाल चंद्रकांत पाटील(Chandrakant patil) यांनी उपस्थित केला आहे.

 

पुढे ते म्हणाले की, “एक सात दिवस क्लिअर ड्राय डे करुन यात नियमावली आखली पाहिजे. त्यामध्ये अत्यंत गांभीर्याने या सगळ्याकडे पाहिले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक अतिरिक्त जागा निर्माण करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत.हे काही किराणा मालाचे दुकान नाही सात दिवस बंद करायला सर्वच दुकान बंद करा आणि सर्व समाजाने एकत्र येऊन नियमावली तयार करा. पुण्यामधील मान्यवरांची एक समिती गठित करून नियमावली ठरवली गेली पाहिजे. उद्यापासून अधिवेशन चालू होते आणि यामध्ये सरकार म्हणून किंवा विरोधक म्हणून चर्चा घडवून आणू सर्व अँगल मिळून एक निर्णय धोरण ठरवू. “असं ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केलं आहे.

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version