spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर गाडी चालवताना राहा सावध, ‘हे’ नियम मोडल्यास…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) वारंवार अपघात (accident) होत असतात. तसेच या मार्गावर वाहतुकीची कोंडी (traffic jam) नेहमी होत असते.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) वारंवार अपघात (accident) होत असतात. तसेच या मार्गावर वाहतुकीची कोंडी (traffic jam) नेहमी होत असते. केंद्र सरकारकडून या एक्स्प्रेससाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल केला गेला आहे. या सर्व प्रकारावर मार्ग काढण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ऑक्टोंबर महिन्यापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पावर सुमारे १६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) असा हा प्रकल्प असणार आहे.

केंद्र सरकारकडून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर अपघात कमी करण्यासाठी पावले उचलली आहे. या महामार्गावर प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी ४३० सीसीटीव्ही कॅमरे (CCTV cameras) इंस्टॉल केले जात आहे. हे हायटेक कॅमरे अद्यावत आहे. त्याची दृश्यमानता चांगली आहे. यामुळे वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना काही मिनिटांत ट्रेस केले जाईल. एमएसआरडीसीकडून (MSRDC) पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर कॅमेरे बसवण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. महामार्गावरील १०६ जागांवर ४३० हायटेक सीसीटीव्ही कॅमरे बसवले जाणार आहेत. एमएसआरडीसीचे एमडी संजय यादव यांनी सांगितले की, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर लावण्यात आलेले सर्व कॅमेरे फायबर नेटवर्कच्या माध्यमातून केंद्रीय नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहे.

इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (Intelligence Traffic Management System) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यात वेगाने वाहन चालवणे, लेन मोडने, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे यासह इतर वाहतुकीच्या नियमांवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास त्वरीत नियंत्रण कक्षातून संदेश जाईल आणि संबंधित वाहनधारकावर कारवाई करण्यात येईल. इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणालीमुळे वाहनधारकांकडून दंडही वसूल होणार आहे. त्यासाठी नंबर प्लेटवरुन नियम मोडणाऱ्या वाहनांची ओळख केली जाणार आहे. तसेच टोलबुथवर ऑटोमैटिक वाहन काउंटर आणि क्लासिफायर इंस्टॉल केला जाणार आहे. मोबाइल वॅन असणार आहे. हे सर्व कॅमेरे लोणावळ्यातील कमांड सेंट्रलमधील कंट्रोल रुमला जोडले जाणार आहे.

Latest Posts

Don't Miss