पुणे पोलिसांकडून कुपवाडमध्ये मोठी कारवाई, ४ हजार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune) मागील काही महिन्यांपासून अनेक ड्रग्जची प्रकरण उघडकीस आली आहेत.

पुणे पोलिसांकडून कुपवाडमध्ये मोठी कारवाई, ४ हजार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune) मागील काही महिन्यांपासून अनेक ड्रग्जची प्रकरण उघडकीस आली आहेत. पुणे पोलिसांकडून दिल्ली आणि त्यानंतर आता सोलापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. आज सकाळपासून पुणे पोलीस कुपवाडमध्ये तपास करत आहेत.

पुणे सारखे मोठ्या शहरात अनेक ड्रग्जची प्रकरण उघडकीस आली आहेत. कुपवाडमधील स्वामी मळा,बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या ठिकाणी पोलिसांची शोधाशोध सुरु आहे. पुण्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडला आहे. नार्कोटेक्स विभागाच्या पथकाकडून सापडलेल्या ड्रग्ज साठ्याचे पंचनामे केले जात आहेत. पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. पुणे पोलिसांनी मागील दोन दिवसांत इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यामध्ये दोन दिवसांत ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. २ हजार किलो एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई केली आहे. वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्यानंतर पोलिसांनी विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून ५५ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापेमारी केल्यानंतर ६०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आहे. वैभव माने आणि हैदर शेख हे दोन गुन्हेगार मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून त्यांनी पुन्हा एकदा दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीमधून पोलिसांनी ६०० किलो एम डी ड्रग्ज जप्त केले आहे. तर दुसरीकडे १२०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी ४ हजार कोटी रुपयांचे २ हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांकडून पुणे, कुरकुंभसह दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. सोमवार पेठेमध्ये करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये २ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. विश्रांतवाडी येथे असलेल्या गोदामातून १०० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे ५५ किलो ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. दिल्लीमध्ये पोलिसांकडून ८०० कोटी रुपयांचे ४०० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.

हे ही वाचा:

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत होणार ‘या’ खलनायिकेची एन्ट्री ,प्रोमो झाला आउट

नैराश्यात असलेल्या मनोज जरांगेंना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत – गुणरत्न सदावर्ते

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version