Thursday, July 4, 2024

Latest Posts

LONAVALA BHUSHI DAM TRAGEDY नंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पर्यटकांसाठी धबधबे बंद?

३० जून २०२४ रोजी लोणावळा (Lonavala) येथे मोठी दुर्घटना घडली आणि भुशी डॅम (Bhushi Dam) येथे पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला असून आता लोणावळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांसाठी सुरक्षा विषयी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे (Pune) जिल्ह्यात असणाऱ्या आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, वेल्हा, मुळशी, भोर, पुरंदर, इंदापूर इत्यादी ठिकाणातील डोंगर, धबधबे, गडकिल्ले, धरण, तलाव, घाट या परिसरात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर कोणतीही बंदी नसून केवळ वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर संध्याकाळी ६ नंतर बंदी आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले.

काय असणार नियम?

  • तलाव, नदी, धबधबे, डोंगरांच्या कड्यांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित केले जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखण्यात येणार आहेत त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत.
  • भुशी, पवनालेक, सिंहगड, लोणावळा, माळशेज घाट, ताम्हिणी घाट इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतचे सूचनाफलक लावण्यात येणार आहेत.
  • प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नसलेले, संभाव्य आपत्ती प्रवण पर्यटन स्थळे, डोंगरकडे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र ओढे तसेच धबधबे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहेत.

  • गिर्यारोहण जलपर्यटन इत्यादी ठिकाणी स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था गिर्यारोहक एनडीआरएफ यशदा व जिल्हा प्रशासनाद्वारे प्रशिक्षक आपदा मित्र स्थानिक स्वयंसेवक इत्यादींची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
  • पर्यटन स्थळावर जीवित हानी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रथमोपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • पर्यटनाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या हॉटेल असोसिएशन टॅक्सी, असोसिएशन रिक्षा चालक संघटना, स्वयंसेवी संस्था इत्यादी संस्थांना विश्वासात घेऊन स्थानिक पातळीवर करायच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

New Criminal Laws Change : देशात आजपासून लागू झाले “हे” नवे कायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss