spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune , मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) हे बॉम्बने उडवून देण्याची धमकी ही आलाय आहे.

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) हे बॉम्बने उडवून देण्याची धमकी ही आलाय आहे. ही धमकी आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली आहे. या धमकीमुळे पुणे पोलीस (Pune Police) सतर्क झाले असून त्यांनी स्टेशनवर चोख बंदोबस्त केला आहे. आजूबाजूला होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर पोलिसांचे लक्ष आहे.

काल रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने एक फोन केला आणि पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून दिल्याची धमकी दिली. ही फोनवरून धमकी मिळताच पुणे पोलीस ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. संपूर्ण पुणे रेल्वे स्थानकात त्यांनी चोख बंदोबस्त केला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. धमकी आल्या आल्या पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच परिसराची पाहणी सुरू केली. पोलिसांनी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढलं. एक्सप्रेस देखील थांबण्यात आल्या होत्या. आणि सर्वत्र बॉम्बचा शोध घेण्यास सुरुवात ही झाली होती. रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचं प्रवाशांना कळाल्यानंतर प्रवाशांचीदेखील तारंबळ उडाली. प्रवासीही आपला जीवमुठीत घेऊन पळत होते. या सर्व घडामोडींवर पोलीस तर लक्ष ठेवून आहेच परंतु प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व गोष्टीमुळे सर्वत्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

पुणे रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे रुळ, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक रुम आणि एक्सप्रेसची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांना रेल्वे स्थानकात सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, हा धमकीचा फोन नक्की कुणी केला? कुठून आला? याची माहिती अद्यापही मिळालेली नाही. पुणे पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांनी वर्दळीच्या या रेल्वे स्थानकाची सुरक्षा अधिक वाढवली असून प्रत्येकाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, आज संक्रांतीचा पहिला दिवस, भोगीच्या दिवशी नक्की काय करतात ?

भाजपने गुप्तपणे नेमकं काय सांगितलं? हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतच असं नाही, राऊतांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss