spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकत्र आत्महत्या करू म्हणतं जीवावर उठला प्रियकर, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

दिवसेंदिवस पुण्यातील धक्कादायक घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. असे असतानाच पुण्यातील आणखीन एक घटना समोर आली आहे. एकत्र आत्महत्या (suicide) करण्यास नकार देणाऱ्या तरुणीला तिच्या प्रियकराने जीवे मरण्याचा प्रयत्न केला आहे.

दिवसेंदिवस पुण्यातील धक्कादायक घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. असे असतानाच पुण्यातील आणखीन एक घटना समोर आली आहे. यावेळी चक्क प्रियकराच तरुणीच्या जीवावर उठला आहे. एकत्र आत्महत्या (suicide) करण्यास नकार देणाऱ्या तरुणीला तिच्या प्रियकराने जीवे मरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियकर आणि तरुणी दोघेही विवाह न करता एकत्र राहत होते. त्यातच प्रियकराने एकत्र आत्महत्या (suicide) करु, असा तगादा तरुणीकडे लावला होता. यासाठी नकार दिल्यावर तरुणीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न प्रियकराकडून करण्यात आला.

ही घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली आहे. तरुणीने नकार दिल्यानंतर तरुणाने स्वत:वर चाकूने वार केले, त्याचबरोबर इमारतीच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी तरुणीला दिली. याप्रकरणी योगेश प्रकाश थोरात (वय २८) याच्याविरुद्ध पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर ससून रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहे. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने कोढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश थोरात हा तरुणीच्या घरा शेजारी राहत होता. त्याने तरुणी अल्पवयीन असताना तिला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले. सातारा, कोल्हापूर भागात दोघेजण एकत्र राहत होते. आरोपी योगेश वाहनचालक म्हणून काम करतो.

काही दिवसांपूर्वी योगेश आणि तरुणी कोंढव्यातील गोकुळनगर भागात वास्तव्यास आले. दोन दिवसांपूर्वी त्याने तरुणीला एकत्र आत्महत्या करु, असे सांगितले. तू खालच्या जातीची आहे. मी पस्तावलो आहे, असे त्याने तिला सांगितले. त्यानंतर तरुणीने आत्महत्या (suicide) करण्यास नकार दिल्यावर त्याने मोबाइल चार्जरच्या वायरीने गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने कसेबसे स्वतःला त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि त्यानंतर योगेशने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. तसेच इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या करेल अशी धमकी तरुणीला दिली. तेथील रहिवाश्यांच्या पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .

हे ही वाचा:

अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम

जेवणाची चव वाढावा, घरी बनवा लज्जतदार शाही फ्लॉवर

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss